पहलगाम हल्ल्याचा कट ‘आयएसआय’नेच रचला!

03 May 2025 14:19:03

The Pahalgam attack was planned by the ISI
 
नवी दिल्ली: (  The Pahalgam attack was planned by the ISI ) पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या ‘राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणे’च्या (एनआयए) चौकशीत दररोज अनेक मोठे खुलासे होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तपासात अनेक पुरावे सापडले आहेत, जे या हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ आणि दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’चा सहभाग दर्शवतात.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एनआयए’च्या तपासात असे दिसून आले आहे की, या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांमध्ये हाशिम मुसा आणि अली भाई हे पाकिस्तानचे रहिवासी आहेत. या हल्ल्यादरम्यानही दहशतवादी त्यांच्या मालकांच्या संपर्कात होते, असे तपासात समोर आले आहे.
 
त्या काळात त्याला पाकिस्तानकडून सूचनाही मिळत होत्या. दरम्यान, तपासयंत्रणेला आतापर्यंतच्या छाप्यांमध्ये अनेक देशविरोधी वस्तू सापडल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एनआयए’ला संशय आहे की, या बंदी घातलेल्या संघटनांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांसाठी ओव्हरग्राऊंड कामगारांचे नेटवर्क तयार करण्यात मदत केली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0