मुंबई उपनगरातील आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण होणार

03 May 2025 13:04:47

Survey tribal villages in Mumbai suburbs
 
मुंबई:  (Survey tribal villages in Mumbai suburbs)  आदिवासी समाजासाठी असलेल्या केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे, याचा आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगरातील आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याचा अहवाल दि. 30 मे रोजीपर्यंत सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शुक्रवार, दि. 2 मे रोजी दिले.
  
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी बांधवांच्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.
  
मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळताना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देशमंत्री पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकही बालक कुपोषित राहू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासाठी दि. 30 मे रोजीपर्यंत कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0