सुहास शेट्टी हत्या प्रकरणी पोलिसांच्या तपासात मोठी बाब उघडकीस

03 May 2025 16:04:29

Suhas Shetty Death Case Update

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Suhas Shetty Death Case Update)
बजरंग दलाचा कार्यकर्ता सुहास शेट्टी याची निघृणपणे हत्या केल्याची घटना कर्नाटकच्या मंगळूर येथे नुकतीच उघडकीस आली. या हत्येशी संबंधित एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होता. यानंतर मंगळुरूमध्ये दि. ६ मे पर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले असून पोलिसांनी हल्लेखोरांना लवकरच अटक करण्याचा दावा केला होता. त्यानुसार मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

हे वाचलंत का? : औवेसींच्या हट्टापायी कर्मचाऱ्याने गमावली नोकरी

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आणि हिंसाचार आणखी वाढू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी रात्री ८.२७ वाजता सुहास शेट्टी एका गाडीतून जात असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुरुवातील त्याच्या गाडीला दोन वाहनांनी अडवले आणि त्यानंतर गाडीतून आलेल्या पाच ते सहा जणांनी सुरजवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यास जेव्हा जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेव्हा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
 
Powered By Sangraha 9.0