श्रीसंतवर पुन्हा बंदी! संजू सॅमसनला सपोर्ट करणं चांगलंच भोवलं, नेमकं प्रकरण काय?

03 May 2025 18:55:04

श्रीसंतवर पुन्हा बंदी! संजू सॅमसनला सपोर्ट करणं चांगलंच भोवलं, नेमकं प्रकरण काय?
तिरुवनन्तपुरम : केरळ क्रिकेट असोसिएशनने माजी भारतीय गोलंदाज एस. श्रीसंतवर ३ वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही कारवाई श्रीसंतने असोसिएशनवर केलेल्या टीकेमुळे करण्यात आली आहे.
विजय हजारे ट्रॉफीसाठी केरळ संघाची निवड झाली असता, अनुभवी फलंदाज संजू सॅमसनला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना श्रीशांतने सोशल मीडियावरून आणि विविध मुलाखतींमधून असोसिएशनवर स्पष्ट शब्दांत टीका केली. त्याने निवड प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप केला आणि संजू सॅमसनसारख्या प्रतिभावान खेळाडूला डावलल्यामुळे संघाचे नुकसान झाल्याचे म्हटले होते.
या टीकेनंतर केरळ क्रिकेट असोसिएशनने याची दखल घेतली असून, श्रीसंतने असोसिएशनची प्रतिमा खराब केल्याचा आरोप करत त्याच्यावर ३ वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे श्रीसंत आता कोणत्याही अधिकृत क्रिकेटशी संबंधित उपक्रमात भाग घेऊ शकणार नाही. याचबरोबर, संजू सॅमसनच्या वडिलांनी देखील आपल्या मुलाला संघातून वगळल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे असोसिएशनने त्यांनाही कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
Powered By Sangraha 9.0