नवी दिल्ली : बँकेत नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत शिपाई या पदासाठी एकूण ५०० जागांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे.
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२५ असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी तारखेपूर्वी आपला अर्ज बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर भरावा. बँक ऑफ बडोदा ही देशातील प्रमुख बँकांमधील एक असून, भारतभर तिच्या शाखा उपलब्ध आहे.
त्यामुळे या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरुपी नोकरी मिळण्याची संधी आहे.
‘ऑफिस असिस्टंट’, सहाय्यक पद यासाठी ही भरती निघणार आहे . या भरतीबाबत अधिक माहिती, https://www.bankofbaroda.in/](https://www.bankofbaroda.in/) या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.