पालघरमध्ये मातेसह नवजात बालकाचा उपचाराअभावी मृत्यू! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे चौकशीचे निर्देश

    03-May-2025
Total Views | 12
 
Neelam Gorhe
 
पालघर : पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश आरोग्य संचालकांना दिले आहेत.
 
डहाणू तालुक्यातील केनाळ बायगुडा येथे सायबू निंजरे सावार (वय २५) या गर्भवती महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचाराच्या अभावामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. या महिलेला प्रसूतीसाठी वेळेत वैद्यकीय सेवा मिळाल्या नसल्याने आणि त्यानंतरही आवश्यक उपचार न मिळाल्याने तिच्यासह बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे वाचलंत का? -  "स्वातंत्र्यानंतर जवळपास सात दशकं उलटली, पण दुर्दैवाने..."; चित्रा वाघ यांचे प्रतिपादन
 
दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. तसेच केनाळ बायगुडा परिसरातील आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर आणि औषधोपचार तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी डॉ. नीलम गोहे यांनी केली आहे. यासोबतच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ही घटना केवळ एका कुटुंबाचे नुकसान नसून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे यावी, असे आवाहन त्यांनी देले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
अभिजीतला

अभिजीतला 'अमोल' साथ; 'सुंदर मी होणार’ नाटकात अभिजीत चव्हाण आणि अमोल बावडेकर दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!

चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या सशक्त भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक वर्षानंतर मराठी रंगभूमीवर काम करणार आहेत. स्वतःची विनोदी इमेज ब्रेक करत एक अत्यंत गंभीर आणि भावनिक पात्र साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिजीत यांना साथ करत अभिनेते अमोल बावडेकर यांचा ही अनोखा अंदाज या नाटकात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121