औवेसींच्या हट्टापायी कर्मचाऱ्याने गमावली नोकरी

03 May 2025 14:08:23

Asaduddin Owaisi Hyderabad Blackout

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Meerut Blackout News)
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देशभरातील मुस्लिमांना १५ मिनिटांसाठी त्यांच्या घरातील लाईट बंद ठेऊन वक्फ कायद्याला निषेध करण्याचे आवाहन केले होते. औवेसींच्या या हट्टापायी एका वीज कर्मचाऱ्याला आपली नोकरी गमवावी लागल्याचे निदर्शनास आले आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधील हे प्रकरण असून गावातील लोकांच्या तक्रारीची ऊर्जामंत्र्यांच्या पातळीवर दखल घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने वक्फ कायद्याविरुद्ध सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये लोकांना रात्री ९ वाजता १५ मिनिटांसाठी त्यांच्या घरातील दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अजरदा वीज केंद्रावर तैनात कंत्राटी वीज कर्मचारी रियाजुद्दीन यांने संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले.


Meerut Blackout News

इन्व्हर्टरवर लाईट वापरणाऱ्यांना धर्मांधांचा विरोध
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर, काही गावकऱ्यांनी जेव्हा त्यांच्या घरांमध्ये इन्व्हर्टर चालू केले, तेव्हा काही धर्मांधांनी त्यास विरोध केला. यामुळे गावात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी ऊर्जा मंत्री सोमेंद्र तोमर यांची भेट घेतली आणि संपूर्ण घटनेची तक्रार केली.

Powered By Sangraha 9.0