लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! १५०० रुपये खात्यात जमा

03 May 2025 13:25:52

Ladki Bahin 
 
मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतिक्षा आता संपली असल्याचे बोलले जात आहे.
 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान, आजापासून हे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी शुक्रवारी दिली. त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
हे वाचलंत का? -  पालघरमध्ये मातेसह नवजात बालकाचा उपचाराअभावी मृत्यू! उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे चौकशीचे निर्देश
 
पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे एकत्र येणार असल्याच्या चर्चाही सुरु होत्या. परंतू, यावेळी केवळ एप्रिल महिन्याचे १५०० रुपये जमा झाले असून लवकरच मे महिन्याचा हफ्तासुद्धा जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0