पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा!

03 May 2025 16:40:07
पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा!


मुंबई, वक्फ कायद्यातील दुरुस्तीच्या निमित्ताने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंदूंचा भीषण नरसंहार करण्यात आला. हा नरसंहार करणाऱ्या जात्यंध समाजकंटकांना पश्चिम बंगाल सरकारने संरक्षण दिले आहे. पश्चिम बंगालमधील सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारे निवेदन भाजपच्या बंगाली प्रकोष्ठतर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना देण्यात आले.

बंगाली प्रकोष्ठचे प्रभारी आणि माजी मंत्री विजय उर्फ भाई गिरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. या शिष्टमंडळात बंगाली प्रकोष्ठचे संयोजक रंजन चौधरी, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुभागत दास, डॉ. प्रियनाथ घोष, निरंजन बोस, चैताली चक्रवर्ती, मंजूला बसाक, प्रदीप हलदर, गोकुळ भंडारी, कल्याण चक्रवर्ती, दीपांजन चक्रवर्ती आदींचा समावेश होता. भाजप बंगाली प्रकोष्ठतर्फे पश्चिम बंगाल मधील नरसंहाराच्या विरोधात नुकतेच धरणे ही धरण्यात आले होते.


Powered By Sangraha 9.0