धारावी बचाव आंदोलनाकडे स्थानिकांची पाठ

03 May 2025 16:14:13

Dharavi meeting organized on Maharashtra Day
 
मुंबई: ( Dharavi  meeting organized on Maharashtra Day ) मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मोठ्या संख्येने समर्थकांसह धारावी बचाव समितीने धारावीत सभेचे आयोजन केले होते. परंतु ही सभा अयशस्वी झाल्याचे दिसून आले. धारावी वाचवा समितीचे समन्वयक राजू कोरडे हे स्वतः बैठकीला उपस्थित होते पण त्यांनी कोणतेही भाषण दिले नाही. यापूर्वी, कोरडे यांनी घोषणा केली होती की, १ मे च्या बैठकीत ते मास्टर प्लॅनची ​​घोषणा करतील. त्यामुळे मास्टर प्लॅनच्या अपेक्षेने जमलेल्या धारावीकरांची सपशेल निराशा झाली.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू कोरडे यांनी सभेला संबोधित करण्याऐवजी त्यांची मुलगी सौम्या यांना भाषणाची संधी देण्यात आली. सौम्या कोरडे यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. यासोबतच, धारावीतील स्थानिक खासदार आणि आमदार असणऱ्या गायकवाड भगिनी देखील या बैठकीपासून दूर राहिल्या. बैठकीच्या शेवटच्या टप्प्यात ज्योती गायकवाड यांनी केवळ फोटोसेशन करण्यपूरती उपस्थित दर्शविली. केवळ काही घोषणाबाजी करून निघून गेल्या.
 
सभेचे सर्वात मोठे अपयश म्हणजे या सभेसाठी साधारण केवळ ४०० लोकांची उपस्थिती होती. यावरून हे स्पष्ट होते आहे की, धारावी बचाव आंदोलनाला नवीन घरात जाऊ इच्छिणाऱ्या सामान्य नागरिकांकडून समर्थन नाही. याबद्दल अधिक बोलायचे झाले तर, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अंतिम टप्प्यात असणारे सर्वेक्षण हे एक मोठे यश आहे. सर्वेक्षणाचे ८०% पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. एक लाखाहून अधिक स्ट्रक्चरर्स आणि ७५,००० स्ट्रक्चरर्सचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच, आजच्या कार्यक्रमातून असे दिसते की धारावी पुनर्विकासाला अधिक गती मिळेल.
 
या सभेची पूर्वकल्पना असूनही, अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत यांसारखे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कोणीही वरिष्ठ नेते उपस्थित नव्हते. माजी आमदार आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते बाबुराव माने यांनी मात्र धारावीकराना उद्भवणाऱ्या समस्येचे गांभीर्य समजत नाहीये असंच म्हणावं लागेल. कारण त्यांनी यावेळी उपस्थितांना धारावीच्या बाहेर फेकून दिले जाईल असे म्हणत धारावीकरांची दिशाभूल केली.
 
 
Powered By Sangraha 9.0