काँग्रेस म्हणजे पाकिस्तान वर्किंग कमिटी – भाजपची टिका

    03-May-2025
Total Views | 8
काँग्रेस म्हणजे पाकिस्तान वर्किंग कमिटी – भाजपची टिका

नवी दिल्ली,  पहलगाम दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर मुद्द्यावर काँग्रेसचा दृष्टिकोन देशविरोधी शक्तींना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे काँग्रेस वर्किंग कमिटीऐवजी त्यांना पाकिस्तान वर्किंग कमिटी म्हणायला हवे, असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार डॉ. संबित पात्रा यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत लगावला आहे.

काँग्रेस आणि गांधी कुटुंब कधीही दहशतवादाला गांभीर्याने घेत नाहीत. जेव्हा देशावर हल्ला होतो तेव्हा काँग्रेस पुरावे मागते आणि सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. अशा विधानांमुळे लष्कराचे मनोबल कमी होते आणि पाकिस्तानला फायदा होतो. काँग्रेस पाकिस्तानच्या सैन्याला आणि दहशतवाद्यांना ऑक्सिजन देते. दररोज एक नेता बाहेर पडतो आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ काहीतरी बोलतो, असे पात्रा म्हणाले.

भाजप प्रवक्त्यांनी काँग्रेसवर मोठा आरोप करत म्हटले की, "बाहेरून ते सीडब्ल्यूसी आहे पण आतून ते पीडब्ल्यूसी (पाकिस्तान वर्किंग कमिटी) बनले आहे. संबित पात्रा यांनी काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांच्या विधानाचा उल्लेख केला, ज्यात त्यांनी पुलवामा हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले होते. ते पुढे म्हणाले, जगातील काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे ज्याला आपल्या नेत्यांना पत्र लिहून देशविरोधी विधान करू नये असे निर्देश द्यावे लागतात, असाही टोला पात्रा यांनी यावेळी लगावला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121