मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या माहिम आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान दि. ३ मे व ४ मेच्या रात्री ४ तासाचा जंम्बो मेगा ब्लॉक असणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हा मेगाब्लॉक रेल्वेमार्ग, सिग्नल प्रणाली, आणि ओव्हरहेड उपकरणांच्या डागडूजीकरता करण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री ००.१५ ते पहाटे ४.१५ या वेळेत मेगाब्लॉक पार पडेल. यामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे वेळापत्रक तपासूनच प्रवासाची आखणी करावी असे आव्हान रेल्वे प्रशासनाने केले आहे.
काम चालू असताना प्रवासी रेल्वे प्रशासनाचे सहकार्य करतील, अशी आशा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत होऊ शकते, असे देखील रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाश्यांना होणाऱ्या गैरसोईबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे.