पनवेलवरून दोन नव्या कॉर्ड लाईनला मंजुरी

29 May 2025 12:57:20

panvel somatane new cord line



मुंबई,दि.२९ : प्रतिनिधी 
मुंबई प्रदेशात रेल्वेची क्षमता वाढवणे आणि कामकाज सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने एका मोठ्या विकासात, रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमटने आणि पनवेल-चिखली दरम्यान एकूण ७.५४ किमी लांबीच्या पनवेल कॉर्ड लाईन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ४४४.६४ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मध्य रेल्वेकडून राबविला जाणार आहे.

पनवेल हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एक महत्त्वाचे टर्मिनल आहे, जे उत्तरेकडे दिवा, दक्षिणेकडे रोहा, पश्चिमेकडे जेएनपीटी आणि पूर्वेकडे कर्जत असे अनेक दिशांना एक महत्त्वाचे जंक्शन म्हणून काम करते. सध्या, ग्रेड-सेपरेटेड क्रॉसिंग नसल्यामुळे इंजिन रिव्हर्सल झाल्यामुळे परिचालनसाठी विलंब होतो.या आव्हानांवर मात करण्यासाठी, दोन कॉर्ड लाईन्स प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या मार्गिकांना आता मान्यता देण्यात आली आहे. या नवीन लिंक्समुळे रेल्वेची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल आणि गर्दी कमी होईल, ज्यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक गाड्यांची वाहतूक सुरळीत आणि जलद होईल अशी अपेक्षा आहे.


• जेएनपीटी-कर्जत कॉरिडॉरवर दिवा-पनवेल लाईन फ्लायओव्हर मार्गे कॉर्ड लाईन.

• काळदुंरीगाव केबिन आणि सोमटणे स्टेशन दरम्यान दुसरी कॉर्ड लाईन.
Powered By Sangraha 9.0