निवृत्तीची घोषणा, IPL दरम्यान सूर्यकुमार यादवची भावनिक पोस्ट

29 May 2025 15:45:08
 
Suryakumar Yadav emotional post during IPL
 
मुंबई : भारतीय टी-20 टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आयपीएल 2025 मध्ये चांगली खेळी केली आहे. सूर्याच्या चांगल्या फॉर्ममुळे आता थेट मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफपर्यंतची मजल मारली आहे. आता फायनलसाठी मुंबई इंडियन्सचा vs गुजरात टायटन्स असा एलिमिनेटर सामना होणार आहे. यापुर्वीच सूर्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सूर्याची ही भावनिक पोस्ट व्हायरल झाली असून सूर्याचे चाहतेही पोस्टवर कमेंट करत आहेत.
 
सूर्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर करत माहिती दिली आहे. त्याने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याचे वडील अशोक कुमार यादव हे नोकरीतून रिटायर झाल्याचे दिसत आहेत.
 
सूर्याचे वडील बीएआरसी मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून नोकरी करत होते. वडिलांच्या रिटायरमेंटच्या क्षणाचे सूर्याने त्याच्या संपूर्ण परीवारासोबतचे फोटो शेअर करत त्याला भावनिक अस कॅप्शन दिलं आहे.
 
वडीलांसाठी सूर्याची भावनिक पोस्ट
 
सूर्याने लिहिले की, "माझ्या पहिल्या आणि कायमच्या नायकाला, आदर्शाला, जीवन पुस्तकाला आणि मार्गदर्शकाला.. तुमच्यासाठी एक महत्त्वाची इनिंग संपली आहे आणि तुम्ही प्रत्येक भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एक सामान्य माणूस ज्याने आपल्याला एक असाधारण जीवन देण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या कामगिरीचा आम्हाला किती अभिमान आहे. बाबा, पुढच्या डावासाठी तयार होण्याची वेळ आली आहे, जी फक्त आरामदायी खेळी असेल."
 
 
Powered By Sangraha 9.0