मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पात लक्षणीय प्रगती

29 May 2025 11:47:25

bullet train


मुंबई, दि. २९:
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आता महाराष्ट्रात ही कामांना गती मिळते आहे. बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकाचे बांधकाम अत्यंत वेगात सुरू असताना आता विरार बुलेट ट्रेन स्थानकासाठी स्लॅब कास्टिंग सूरु झाले असल्याची माहिती, नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)ने दिली आहे.

एनएचएसआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार, विरार बुलेट ट्रेन स्थानकावर पहिल्या स्लॅबचे कास्टिंग सुरू झाले आहे. हा स्लॅब 50 मीटर लांब, 35.32 मीटर रुंद असून सुमारे 300 मिमी जाडीचा आहे, ज्यामध्ये 1555 घन मीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. या स्तरावर अशा एकूण 9 स्लॅब असतील, जे स्थानकावर ट्रॅक टाकण्याच्या कामाचा पाया तयार करतील. स्थानकात दोन स्तर असतील – कॉन्कोर्स स्तर आणि रेल स्तर, ज्याची एकूण लांबी 425 मीटर आहे. विरार बुलेट ट्रेन स्थानक डोंगरावर स्थित आहे, त्यामुळे त्याची संकल्पना पर्वतांवरून वाहणाऱ्या वाऱ्यांवर आधारित अशी आकर्षक असणार आहे.


स्थानकाविषयी ग्राफीक नोट

स्थानकाला जोडणारी परिवहन साधने अंतर

विरार रेल्वे स्थानक 8 किमी

पेलहार रोड 1 किमी

विरार नाला सोपारा रोड 4.5 किमी

चंदनसर रोड 9.5 किमी

राष्ट्रीय महामार्ग 48 6 किमी

प्लॅटफॉर्म

दोन्ही बाजूला फलाटमध्ये 4 ट्रॅक
कॉनकोर्स स्तर

सुरक्षा व्यवस्था

कस्टमर केअर

तिकिट घर

बिझनेस लॉउंज

प्रतिक्षालय

स्वच्छता गृह

नर्सरी
दुकाने
प्राथमिक आरोग्य केंद्र
लिफ्ट आणि विद्युत जिने
Powered By Sangraha 9.0