अहिल्यानगरमधील धार्मिक स्थळे जोडणारा नवा रेल्वेमार्ग

29 May 2025 12:53:12

central rail



मुंबई,दि.२९ : प्रतिनिधी 
रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राहुरी ते शनी शिंगणापूर येथे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. २१.८४ किमी लांबीचा हा मार्ग ४९४.१३ कोटी रुपयांच्या मंजूर खर्चाने विकसित केला जाईल.

दररोज ३०,००० ते ४५,००० भाविक ये-जा करणारे एक प्रमुख धार्मिक स्थळ असलेल्या शनी शिंगणापूर येथे सध्या थेट रेल्वे जोडणीचा अभाव आहे. या तयार होणाऱ्या मार्गामुळे आध्यात्मिक केंद्रापर्यंत पोहोचणे मोठ्या प्रमाणात वाढेल आणि यात्रेकरू आणि पर्यटकांची, विशेषतः राहुरी आणि जवळच्या भागातील, सुरळीत हालचाल सुलभ होईल.

या रेल्वे मार्गामुळे शिर्डी, राहु-केतू मंदिर (राहुरी), मोहिनी राज मंदिर (नेवासा) आणि पैस खांब करवीरेश्वर मंदिर (नेवासा) यासारख्या इतर धार्मिक आणि पर्यटन स्थळांनाही फायदा होईल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. सविस्तर प्रकल्प अहवालात (डीपीआर) दररोज चार जोड्या प्रवासी गाड्यांचा प्रस्ताव आहे, ज्यामध्ये अंदाजे वार्षिक प्रवासी संख्या १८ लाख असेल. भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या आध्यात्मिक केंद्रांपैकी एक असलेल्या ह्या केंद्रा करीता ही पायाभूत सुविधा आणि दळणवळण सुधारण्यासाठी हा विकास एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे.
Powered By Sangraha 9.0