मुंबईतील शिक्षकांसाठी महा-युवा संमेलनाचे आयोजन!

28 May 2025 13:31:04

Pravin Darekar


 
मुंबई : डॉ. विशाल कडणे यांच्या संकल्पनेतून मुंबई शहर आणि आसपासच्या विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकरता मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ यांच्यावतीने दि. २८ मे रोजी महा-युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलुंड पश्चिम येथील कालिदास नाट्यगृह येथे सांयकाळी ७ ते रात्री १० पर्यंत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
या महा-युवा संमेलनामसाठी आ. प्रवीण दरेकर व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या महा-युवा संमेलनामसाठी मुंबई शहर आणि आसपासच्या विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ व मंडळाचे कार्यकारिणी सदस्य डॉ. विशाल कडणे यांनी केले आहे.
  
 
Powered By Sangraha 9.0