लखनऊ : स्वतःची गुड्डू, अशी ओळख सांगत. हिंदू असल्याचे भासवत पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार अफझल हुसेन या आरोपीने केला आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीतील मीरगंज येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी गुड्डू हे नाव लावले. हातात दोरा बांधला, मंदिरात जाऊन पूजा करण्याचे नाटकही केले. या सर्व बनावात तरुणी अडकल्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
पीडित तरुणी अफजलच्या सापळ्यात अडकली तेव्हा तिचे लैंगिक शोषण सुरू केले. तिला जेव्हा सत्य परिस्थिती कळली तेव्हा तिने संपर्क तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने पीडितेचे धर्मांतरण करुन निकाह करण्यासाठी जबरदस्ती सुरू केली. याबद्दल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफजलला आधीच अटक झाली होती.
परंतू अफजलच्या पालकांनी मुलीची माफी मागितली आणि त्याला तुरुंगातून सोडवले. परंतु पुन्हा अफजल तुरुंगाबाहेर येताच त्याने पुन्हा मुलीला धर्मांतर करण्याचे सांगत धर्मांतर न केल्यास तिचे धड आणि शरीर वेगळे करण्याची धमकी दिली. दरम्यान यानंतर या पीडीत मुलीने मिरगंज पोलिस ठाण्यात अफजल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी अफजल फरार आहे.