नको त्या व्यक्तीशी वैष्णवीचे चॅटिंग! हगवणेंच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय! कोर्टात काय घडलं?

28 May 2025 17:14:52

Vaishnavu Hagvane 
 
पुणे : वैष्णवी हगवणे नको त्या व्यक्तीशी चॅटिंग करत असून आम्ही ते पकडले, असा युक्तीवाद हगवणे कुटुंबाच्या वकीलांनी न्यायालयात केला आहे. बुधवार, २८ मे रोजी पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची सुनावणी पार पडली.
 
यावेळी वैष्णवी हगवणेचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर तिची सासू लता हगवणे, नणंद करीश्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, सुनावणीदरम्यान, हगवणे कुटुंबाच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
 
हे वाचलंत का? -  मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस! कुठे कुठे बरसला?
 
बुधावारी पार पडलेल्या सुनावणीवेळी संपूर्ण हगवणे कुटुंबाला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी "वैष्णवी एका अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करत असून ते आम्ही पकडले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार झाल्याचा युक्तीवाद आरोपींच्या वकीलाने केला आहे. तसेच नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणे म्हणजे छळ नाही. वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती, असाही युक्तीवाद वकीलाने केला आहे.
 
आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या असून आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्चुनरसाठी कशाला छळ करु? असा सवालही आरोपींच्या वकीलांनी केला. सुनावणीदरम्यान, आरोपींच्या वकीलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वकीलांचा हा युक्तीवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0