नाशिक : राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी जेव्हा नाशिकमध्ये येतील तेव्हा आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा धमकीवजा इशारा उबाठा गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत बिघाडी आल्याचे बोलले जात आहे.
हे वाचलंत का? - भाऊचा धक्का हे काही कराचीमधलं बंदर नाही! इथे हिरव्या सापांची वळवळ सहन करणार नाही : मंत्री नितेश राणे
बुधवार, २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त नाशिकमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माध्यमांशी बोलताना उबाठा गटाचे नाशिकमधील उप महानगरप्रमुख बाळा दराडे म्हणाले की, "राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी सावरकरांबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी नाशिकमध्ये येतील तेव्हा आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासू. आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले नाही तर त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू आणि सावरकरांचे हिंदूत्ववादी सैनिक कसे असतात हे आम्ही त्यांना दाखवून देऊ," अशी धमकी त्यांनी दिली.