नवी दिल्ली : कॅन्ट परिसरात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या चार बांदलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळ्यात एटीएसला यश आले आहे. १२ वर्षांपासून हे घुसखोर भारतात राहत होते दिल्ली पोलीस प्रशासनाच्या एएटीएसने या बांगलादेशी घुसखोरांना पकडले आहे. त्यांच्याकडे बांगलादेशी ओळखपत्रे आणि काही बनावट कागदपत्रे सापडली आहेत.
दिल्ली जिल्हा पोलिस प्रशासनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या घुसखोरांना हद्दपारी केंद्रात पाठवण्यात आले आहे. पकडलेल्या बेकायदेशीर बांगलादेशींमध्ये ४० वर्षीय नसीम बेगम, १३ वर्षीय आशा मोनी, ४४ वर्षीय असद अली आणि १८ वर्षीय नईम खान हे सर्वजण बांगलादेशमधील कुरीग्राम, फारुख बाजार, अजबदारी गोंगरहट फुलबारी येथील मुळचे रहिवासी आहेत.
या सर्व घुसखोरांनी १२ वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधून गुप्तपणे नदी ओलांडली आणि बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर हे सर्व दिल्लीत राहू लागले.
यापूर्वी, दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत मेवात हरियाणातील वीट भट्टीवर काम करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांनाही पकडले होते. त्यानंतर २३ मे २०२५ रोजी वजीरपूर येथील जेजे कॉलनीमध्ये पोलिसांच्या देखरेख मोहीमे दरम्यान पोलिसांना बेकायदेशीर बांगलादेशी आढळले होते. हे बांगलादेशी घुसखोर जेजे कॉलनीपूर्वी दिल्लीतील इतर अनेक ठिकाणीही राहत होते हे पोलिस तपासात समोर आले.