Vibha Guidance Hub तर्फे आयोजित VGH महा एक्झिबिशन 2025

27 May 2025 18:32:15
Vibha Exhibition at Dadar


मुंबई : Vibha Guidance Hub तर्फे आयोजित VGH महा एक्झिबिशन 2025 हा बहुआयामी सामाजिक उपक्रम दिनांक 29 मे ते 1 जून 2025 दरम्यान IES अश्लेन शाळा, डी. एस. बाब्रेकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई – 400028 (कॅटरिंग कॉलेजच्या मागे, शिवाजी पार्क टेलिफोन एक्सचेंजजवळ) येथे सकाळी 11 ते सायंकाळी 8 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.


या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आरोग्य विषयक जनजागृती, मानसिक समुपदेशन, महिला सक्षमीकरण आणि लघुउद्योजकांना प्रोत्साहन देणे हा आहे. चार दिवस चालणाऱ्या या भव्य प्रदर्शनामध्ये ५० पेक्षा अधिक स्टॉल्सद्वारे
आरोग्य, सक्षमीकरण व जीवनशैलीशी संबंधित उत्पादने आणि सेवा सादर करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त, विविध नवकल्पनांना वाव देणारे प्रॉडक्ट शो, सर्वांसाठी हेल्थ कॅम्प, आणि समाजोपयोगी डोनेशन ड्राईव्ह आयोजित करण्यात आले आहेत.


कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे VGH क्वीन 2025 ही महिला सक्षमीकरणासाठी खास रचना केलेली व्यक्तिमत्व स्पर्धा, तसेच पारंपरिक पैठणी सौंदर्य साजरे करणारी “पैठणीचा नखरा” स्पर्धा. यासोबतच, विविध वयोगटांतील स्पर्धकांसाठी नृत्य स्पर्धा, चविष्ट कल्पनांचा उत्सव असलेली पाककला स्पर्धा आणि लघुउद्योजकांसाठी बिझ किटी या नेटवर्किंग सत्राचाही समावेश आहे.
या एक्झिबिशनमध्ये हीलिंग, न्यूमेरॉलॉजी, वर्क फ्रॉम होम संधी, व्यवसाय विकास व बचत गटांवरील मार्गदर्शन सत्रे आयोजिलेली असून, सर्व कार्यक्रम माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरणार आहेत. विविध शेत्रातील महिला मंचाच्या सदस्यांना विशेष सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, सर्व सहभागी व प्रेक्षकांना कार्यक्रमात मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

VGH महा एक्झिबिशन 2025 हा सामाजिक बांधिलकी, संस्कृती, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यांचा संगम साधणारा एक उपक्रम आहे. समाजातील विविध घटकांपर्यंत या कार्यक्रमाचा पोहोच वाढवण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावे, असे Vibha Guidance Hub तर्फे आवाहन करण्यात आले आहे.


अधिक माहितीकरिता संपर्क:


📞 8805183579 / 9022217147 / 99309 99771/ 8422931272
📧 vgh.events2025@gmail.com
📍 IES Ashlane School,
D.S. Babrekar Marg, Dadar West, Mumbai – 400028
(Behind Catering College, near Shivaji Park Telephone Exchange)



Powered By Sangraha 9.0