वीर सावरकरांच्या गीताला राज्य प्रेरणागीत पुरस्कार

27 May 2025 14:13:00
Savarkar

मुंबई : कवी मनाचे महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षीपासून सांस्कृतिक विभागातर्फे दिला जाणार पहिला 'राज्य प्रेरणा गीत पुरस्कार' स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या "अनादी मी अनंत मी..." या गीताला प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मंगळवार, दि. २७ मे रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

वर्षा निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार संजय उपाध्याय, सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे उपस्थितीत होते.

वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी हा पुरस्कार स्विकारला. दोन लाख रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
Powered By Sangraha 9.0