ज्योती मल्होत्राचा पाय आणखी खोलात! डिलीट केलेला लॅपटॉप डाटा जप्त

27 May 2025 15:01:13
 
Jyoti Malhotra
 
मुंबई : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राचे पाय आणखी खोलात गेले आहेत. तिने डिलीट केलेला लॅपटॉप डाटा जप्त करण्यात आला असून यातून पाकिस्तानशी संबंधित अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
युट्यूबर ज्योती मल्होत्राला हरियाणाच्या हिसार येथील स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबमधून आरोपी ज्योती मल्होत्राच्या लॅपटॉप आणि फोनमधून डिलीट केलेला १२ टीबी (टेराबाईट डेटा) जप्त केला आहे. यासोबतच ज्योतीचा मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तुदेखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
 
 हे वाचलंत का? - "आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी राजकारण..."; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया
 
पोलिसांनी जप्त केलेल्या डेटामध्ये ज्योतीचे फोन कॉल्स, व्हिडीओ, चॅटिंग यासह अनेक बाबी हाती लागल्या आहेत. या सर्व बाबींचा तपास सुरु असून ज्योती मल्होत्राने पाकिस्तानला कोणती माहिती पुरवली? आणि ती कुणाच्या संपर्कात होती? हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0