स्वयंपुनर्विकासासंदर्भात आ. दरेकरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट

27 May 2025 16:29:37
Darekar met Home Minister Amit Shah regarding self-redevelopment.

मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासंदर्भात आज भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमुळे गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासाकरिता अर्थ पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर आ. दरेकर म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सह्याद्री अतिथी गृह येथे भेट घेतली. या भेटीत मुंबईत सुरु असलेल्या गृहनिर्माण स्वयं पुनर्विकासासाठी नॅशनल को.ऑप. डेव्हॅलपमेंट कॉर्पोरेशन (एनसीडीसी) कडून अर्थपूरवठा करण्याची मागणी केली. तसेच एनसीडीसीच्या कर्ज मंजुरी पत्रातील (अर्बन हौसिंग) ही अट वगळण्याची विनंतीही केली असून या विषयासाठी दिल्लीत बैठक आयोजित करू असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचे दरेकर म्हणाले. तसेच मी आणि मुख्यमंत्री फडणवीस अमित शहा यांना ही योजना समजावून सांगण्यात यशस्वी झालो असून यामुळे मुंबईतील गृहनिर्माण स्वयं पुनर्विकासाला गती मिळणार असल्याचा विश्वासही दरेकर यांनी बोलताना व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0