ओडिशा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली आणि त्यांची पत्नी अर्पिता गांगुली यांचा ओडिशामध्ये अपघात झाला. पुरीजवळील समुद्रात त्यांची स्पीडबोट उलटली, स्पीडबोटवर ४ पर्यटक होते. त्यापैकी सौरव गांगुलीचा भाऊ आणि मेहुणी होते. ’कोलकाता परतल्यानंतर मी पुरीचे एसपी आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीन’ अर्पिता गांगुलीने प्रतिक्रिया व्यक्त केली.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली आणि त्यांची पत्नी अर्पिता गांगुली यांचा ओडिशामध्ये पुरीजवळील समुद्रात त्यांची स्पीडबोट उलटली मात्र, जीवरक्षकांनी सुरक्षितपणे त्यांचा जीव वाचवला. अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. माहितीनुसार, स्पीडबोटवर ४ पर्यटक होते. त्यापैकी स्नेहाशिष गांगुली आणि त्यांची पत्नी स्पीडबोटवर होते. चारही पर्यटकांचा जीव वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले आहे. पीटीआयने त्यांच्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
बचावकार्यानंतर, अर्पिता गांगुलीने मीडियाशी बोलताना म्हणाली, "देवाच्या कृपेने आम्ही वाचलो. मी अजूनही धक्क्यात आहे. असे घडू नये आणि समुद्रात खेळ योग्यरित्या केले पाहिजेत. कोलकाता परतल्यानंतर मी पुरी एसपी आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीन."
स्नेहाशिष गांगुली हे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चे अध्यक्ष आहेत. बंगाल क्रिकेट संघासाठी ५९ सामने खेळले गेले आहेत. स्नेहाशिष हे त्यांच्या धाकटा भाऊ सौरव गांगुलीसारखा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले नाही. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यानी त्यांच्या कुटुंबाच्या छपाई व्यवसायावर लक्ष दिले. गेल्या १५ वर्षांत, स्नेहाशिष गांगुली यांनी एनके गोसैन प्रिंटर्स चे काम हाती घेतले आणि एनके गोसैन प्रिंटर्स हे आता सर्वात प्रसिद्ध छपाई कंपन्यांपैकी एक बनले आहे.