वरळीतील बेकायदेशीर दर्ग्याचे अतिक्रमण हटवले; वरळी भाजप कार्यकर्त्यांची तत्परता

26 May 2025 13:50:57

Worli illegal dargah news

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Worli illegal dargah news)
वरळीतील सासमीरा रोडवरील गुलिस्तान इमारतीच्या शेजारी असलेल्या सोसायटीच्या जागेवर बेकायदेशीररीत्या एका दर्ग्याचे अतिक्रमण करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर आणि अतिक्रमणाच्या वाढत्या प्रयत्नांमुळे, वरळीतील भाजप कार्यकर्त्यांनी या बेकायदेशीर अतिक्रमणाचा निषेध करत ती जागा त्वरित मोकळी करून घेतली.

हे वाचलंत का? : मुंबई तुंबली! लोकलसेवा विस्कळीत; राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस

या कारवाईदरम्यान स्थानिक नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. भाजप कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे सोसायटीची जागा बळकावण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले.
Powered By Sangraha 9.0