मासिक पाळी - स्त्रीच्या शरीरातील एक सशक्त चक्र

26 May 2025 14:16:51

Sonali Pasi
Sonali Pasi on Masik Pali

आज मी ज्या विषयावर बोलणार आहे, तो विषय आपल्या रोजच्या आयुष्यातील आहे, पण दुदैवाने अजुनही अनेकांच्या ओठांवर येत नाही - तो म्हणजे मासिक पाळी आणि शाळा. मासिक पाळी ही एक नैसर्गिक आणि शारीरिक पाळी प्रक्रिया आहे. ती कोणतीही लाज, भीती किंवा अपराध नसून, स्त्रीच्या शरीरातील एक सशक्त चक्र आहे. तरीही आपल्या समाजात अजूनही पाळीला गुपित, घाणेरडं, आणि लाजिरवाणं समजलं जातं.

शाळा म्हणजे केवळ पुस्तकांचं ठिकाण नाही, तर विचारांचं, समजूतदारपणाचं आणि समानतेचंही स्थान आहे. पण दुर्देवाने, अनेक मुलींना मासिक पाळीच्या काळात शाला सोडावी लागते, केवळ योग्य सुविधा नसल्यामुळे. अनेक शाळांमध्य अजुनही स्वच्छतागृहांचा अभाव आहे, सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता नाही, आणि शिक्षकांनाही या विषयावर बोलताना संकोच वाटतो,
शाळेतील मुली जेव्हा मासिक पाळी बद्दल विचार करतात तेव्हा त्या म्हणतात..

प्रिय मासिक पाळी, तु मला अजिबात आवडत नाहीस, तू आलीस की माझी खुप चिडचिड होते. माझ्या पोटातं दुखते, कंबर दुखते, पण तू येत नाहीस तेव्हा वाटते की कधी येशील, आणि आली की वाटते - तू कधी जाशील. मला माहिती आहे- तू म आमच्या चांगल्या साठीच येतेस. कारण जर आपल्याला मासिकपाळी आलीच नाही-तर आम्हाला मुले नाही होऊ शकणार. पण तू दर महिन्याला कशाला येतेस ? वर्षातून एखाद वेळेस 'आलीस तरी चालेल. नाहीतर महिन्यातून एकच दिवस थे. पण येताना पिंपल्स आणि पोटदुखीला आणु नको!.

आपण समाज म्हणून जर खरंच प्रगती करत असू तर आपल्याला मुलींना मासिक पाळीच्या काळात सन्मानाने शिक्षण देणं आवश्यक आहे. शाळांमध्ये आरोग्य शिक्षणाचं विशेष सर एक दृष्टीकोन सप्त, पुरेशा गुविधा, भाणि सकारात्मक विकसित करणं गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन भारत सरकारने यावर काही उपाययोजना केल्या, भारत सरकार यांनी स्वच्छ भारत, स्वच्छ वि‌द्यालय राष्ट्रीय अभियान सप्टेंबर २०१४ पासून सुरू केले आहे. यानुसार देगातील प्रत्येक शाळेत पिण्याचे पाणी, मुला-मुलीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, हात धुण्याची सुविधा, अपंगांसाठी स्वच्छतागृहांची विशेष सुविधा उपलब्ध असणे व त्यासाठी क्षमता बांधणी व देखबाल दुरुस्ती होणे आवश्यक आहे. याच अभियानाचा एक अविभाज्य भाग म्हणुन मासिक पाळी व्यवस्थापनाकडे देखील लक्ष वेधलेले आहे. शाळेत येणाऱ्या किशोरवयीन मुलींची कोणत्याही प्रकारे कुचंबना होऊ नये व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मासिक आणि शाळा हा विषय महत्त्वाचा आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अस्वालनुसार ७२ टक्के मुली या मासिक पाळीच्या दरम्यान शाळेत अनुपस्थित राहतात. भारतासारख्या विविध रुठी परंपरांना मानणाऱ्या देशात मासिक पाळी या विषयावर पुरुषांशी बोलणे तर दूरर्च, महिला महिलांशीही चर्चा करणे सब राबतात. या विषयाबाबत अनेक समाज समज - गैरसमज असल्याने मासिक पाळी या विषयावर चर्चा करणे, रे अयोग्य मानले जाते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात युनिसेफने केलेल्या एक सर्वेक्षणात असे आढळून आले वर्षे वयोगरातील केवळ १३ टक्के मुलींना पहिली पाळी येण्याअगोदर पाळी बाबत माहिती होती. आणि ६० ते ७० टक्के किशोरवयीन मुली पाळीच्या दरम्यान शाळेत जात नाहीत, अश्या परिस्थितीत शाळकरी मुलींना जर वेळीच योग्य शिक्षण व मार्गदर्शन मिळाले तर निश्चितच या परिस्थितीत बदल होईल, हे लक्षात घेऊन स्वच्छ भारत, स्वच्छत विद्यालय मिशनमध्ये या विषयाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. मुली शिकत आहेत ज्या शाळेत किशोरवयीन त्या शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा, पुरेशा प्रमाणात गोवकांची सॅनिटरी पॅड, सुती कापड त्यांची विल्हेवाट लावण्याची सुविधा व योग्य असे मार्गदर्शन, असे या मासिक पाळीच्या व्यवस्थापनाचे मुख्य घटक आहे.

मला शेवटी शाळेत येणाऱ्या माझ्या पाळी बद्दल ऐवढेच म्हणायचे आहे. त्या पाच दिवसांच्या प्रवाहाला, तु तरी मला समजुन घेशील ना? समजुन तु घेताना मला, काळजी माझी घेशील ना?
माहिती आहे शाळा आहेस तुमाझी म्हणून नाही केली मी तुझ्याकडून पंचपक्वानाची आर्ज वे.. शाळेतील मिळणारा मायेचा वरण भात तुझ्या हातानी भरवशील ना ?
जेव्हा पोटदुखीचा वेदनेचा फुलत जाईल काटा... गरम पाण्याच्या पिशवीचा झुला माझ्यासाठी बांधशील ना ?
जेव्हा बारेस धारेसारखा वाढत जाईल माझ्या रक्ताचा प्रवाह तुझ्या मायेच्या प्रेमाच्या मिठीत मला समावून घेशील ना ?

सोनाली श्यामदेव पासी
क.व कन्या विद्यालय, पनवेल
 
Powered By Sangraha 9.0