अहिल्यानगरमधील धार्मिक स्थळे जोडणारा नवा रेल्वेमार्ग;रेल्वे मंत्रालयाची मान्यता ,४९४ कोटी खर्च अपेक्षित

26 May 2025 17:22:31


New route for connecting places in Ahilyangar

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राहुरी ते शनी शिंगणापूर येथे जोडणार्‍या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. 21.84 किमी लांबीचा हा मार्ग 494.13 कोटी रुपयांच्या मंजूर खर्चाने विकसित केला जाईल.

शनी शिंगणापूर आणि आसपासच्या अनेक धार्मिक स्थळी रोज 30 हजार ते 45 हजार भाविक येतात. मात्र, इथे येण्यासाठी थेट रेल्वे जोडणी नाही. या नवीन रेल्वे मार्गामुळे येथील वाहतूक वाढेल आणि यात्रेकरूंच्या मांदियाळीमुळे येथील पर्यटनाला चालना मिळेल. विशेषतः राहुरी आणि जवळच्या भागांत दळणवळण सुरळीत होईल.

या रेल्वे मार्गामुळे शिर्डी, राहु-केतू मंदिर (राहुरी), मोहिनी राज मंदिर (नेवासा) आणि पैस खांब करवीरेश्वर मंदिर (नेवासा) यांसारख्या इतर धार्मिक आणि पर्यटन स्थळांनाही फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. ज्यामुळे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. सविस्तर प्रकल्प अहवालात (डीपीआर) दररोज चार जोड्या प्रवासी गाड्यांचा प्रस्ताव आहे, ज्यामध्ये अंदाजे वार्षिक प्रवासी संख्या 18 लाख असेल. भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या आध्यात्मिक केंद्रांपैकी एक असलेल्या या केंद्राकरिता ही पायाभूत सुविधा आणि दळणवळण सुधारण्यासाठी हा विकास एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे.
Powered By Sangraha 9.0