चाबहार-ग्वादर बंदरे पीएलएच्या ताब्यात गेल्यास भारतासाठी विनाशकारी ठरेल : मीर यार बलूच

26 May 2025 17:06:58

Mir Yar Baloch on Chabahar Port

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mir Yar Baloch on Chabahar Port) 
"काही महिन्यांपूर्वी इराण-पाकिस्तान-चीन यांच्यात परराष्ट्र मंत्रालयाच्या स्तरावर बैठक झाली होती आणि त्यांनी चाबहारला ग्वादरसोबत जोडण्याचा करार केला. जर बलुचिस्तानमधील हे दोन अत्यंत महत्त्वाचे बंदर चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पीएलएच्या (पिपल्स लिबरेशन आर्मी) ताब्यात गेले, तर हे भारत, अमेरिका आणि बलुचिस्तानसाठी अत्यंत विनाशकारी ठरेल.", असे मत बलुच नेते मिर यार यांनी व्यक्त केले.

हे वाचलंत का? : जगाने पाकिस्तानच्या लष्करावर शस्त्रास्त्र बंदी लादावी!

बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग नाही, बलुचिस्तान स्वतंत्र आहे अशी घोषणा मिर यार यांनी नुकतीच केली होती. त्यानंतर भारत, अमेरिकेसारख्या राष्ट्रांना बलुचिस्तानच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही केले. मीर बलूच यांचे म्हणणे आहे की, चीन, तुर्की, पाकिस्तान आणि इराण यांनी हातमिळवणी केली असून ते अधिक आक्रमकपणे त्यांच्या लष्करी ताकदीचे एकत्रीकरण करत आहेत. ते आपली सामरिक साधने आणि हस्तकांचा वापर करून भारताला समुद्र, आकाश आणि जमिनीवरून अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुढे ते असेही म्हणालेत की, चीन आयएसआय द्वारे वित्तपुरवठा केलेल्या जिहादींना मोठ्या प्रमाणात प्राणघातक शस्त्रास्त्रे देत आहे आणि पाकिस्तानच्या हवाई दलाला, नौदलाला त्यांच्या हवाई संरक्षण प्रणाली मजबूत करण्यात मदत करत आहे, जेणेकरून युद्धाच्या स्थितीत पाकिस्तानच्या लष्करी साधनसंपत्तीचे रक्षण करता येईल.
Powered By Sangraha 9.0