जगाने पाकिस्तानच्या लष्करावर शस्त्रास्त्र बंदी लादावी!

26 May 2025 15:18:57

Pak Army
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Balochistan on the Pakistan military) पाकड्यांनी रचलेल्या वंशविच्छेदाच्या व्यापक कटाबाबतचा खुलासा बलुच नेते मीर यार यांनी नुकताच आपल्या ट्विटमधून केला. 'बलुच लोकांना गॅस गळती करून ठार मारले पाहिजे, आणि तेथील आईच्या गर्भात असलेल्या बाळांनाही ठार केले पाहिजे', असे विकृत विचार पाकिस्तानच्या पंजाप प्रांतातून व्यक्त होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता जगाने पाकिस्तानच्या लष्करावर शस्त्रास्त्र बंदी लादावी आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने यासंबंधित एक ठराव पारित करावा अशी महत्त्वाची मागणी बलुचिस्तानमधील लोक करतायत.

हे वाचलंत का? : पाकड्यांकडून वंशविच्छेदचा व्यापक कट!

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लष्कराला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र पुरवठा होत असल्याने बलुच लोक चिंतित आहेत. कारण शस्त्रास्त्र आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराद्वारे प्रायोजित जिहादींकडे दिले जाणार असल्याचे बलोच नेते मीर यार यांचे म्हणणे आहे. अमेरिकन अहवालांनुसार, भारतासोबत संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान लष्कर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र मिळवत असल्याचेही त्यांनी म्हटलेय.
 
बलुचिस्तानचा मित्रराष्ट्रांकडे मदतीचा हात
बलुच लोकांच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी मदत करण्याची मागणी बलुचिस्तानने आपल्या मित्रराष्ट्रांकडे केली आहे. पाकिस्तान बलुचिस्तानमधील खनिज लुटून प्राणघातक शस्त्रास्त्रे खरेदी करत आहे. एकदा प्रादेशिक समुदायाने बलुच संरक्षण दलांना सक्षम केले, की पाकिस्तानला बलुचिस्तानच्या खनिजांचा पुरवठा थांबवणे शक्य होईल.

Powered By Sangraha 9.0