मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभागाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पना आशियाई बँकेच्या निधी विषयी चाचपणी

26 May 2025 17:58:48

Asian Bank to fund for Development of Fisheries and Ports In India


मुंबई : मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदर विभागामार्फत राज्यात अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. या प्रकल्पांना आशियाई बँकेकडून निधी उपलब्ध होण्याबाबत आज मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांनी आशियाई बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी आशियाई बँकेचे राष्ट्रीय संचालक मिओ ओका, राष्ट्रीय उपसंचालक आरती मेहरा, नगर विकास तज्ञ संजय जोशी, प्रकल्प अधिकारी भावेश कुमार हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर 'उदय' चे सल्लागार प्रितेश बाफना उपस्थित होते.

यावेळी मुंबईतील तारापोला मत्स्यालय, मुंबईतील वॉटर मेट्रो, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड चे नवीन बंदर उभारणी, विद्यमान बंदराची देखभाल दुरुस्ती, आणि देखरेखीसाठीच्या निधीविषयी चर्चा करण्यात आली. सकारात्मक झालेल्या या चर्चेमध्ये आशियाई बँक अधिकारी यांनी लोक हिताच्या व विकासाच्या या प्रकल्पांमध्ये निधी देण्याविषयी सकारात्मकता दर्शवली. तसेच सोव्हारींग आणि नॉन सोव्हारींग निधी विषयीची सविस्तर माहिती दिली.
प्राथमिक स्वरूपात झालेल्या आजच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पांचा व निधीचा अभ्यासकरून तो पुन्हा आशियाई बँकेस सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या चर्चेमुळे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभागाच्या अनेक प्रकल्पांना निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच मंत्री राणे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांना आर्थिक बळ मिळणार आहे.
Powered By Sangraha 9.0