मिठी नदी घोटाळ्याबाबत अभिनेता डिनो मोरियाची चौकशी

26 May 2025 18:47:43
Actor Dino Morea questioned for Mithi River scam


मुंबई: मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवार, दि. २६ मे रोजी अभिनेता डिनो मोरिया याची चौकशी केली. सकाळी ११ वाजता तो आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला. या प्रकरणात याआधी त्याचा भाऊ सँटिनो मोरिया याचीही चौकशी करण्यात आली आहे.

मिठी नदी स्वच्छता घोटाळ्यात आतापर्यंत १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम याने अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी फोनवरून अनेकदा संभाषण केल्याचे समोर आल्यामुळे डिनो याला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले. या तिघांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय असल्यामुळे त्यांचे कॉल रेकॉर्डिंग तपासले जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
Powered By Sangraha 9.0