लालू प्रसाद यादव यांच्या मुलाची राष्ट्रीय जनता दलातून हकालपट्टी!

25 May 2025 18:13:01
लालू प्रसाद यादव यांच्या मुलाची राष्ट्रीय जनता दलातून हकालपट्टी!

नवी दिल्ली : तेज प्रताप यादव यांनी फेसबुकवर आपल्या खासगी आयुष्या बदल पोस्ट शेअर केल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव याला सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्याची घोषणा केली, व तेज प्रताप यांची आतापासून पक्षात आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही. ’तो त्याच्या वैयक्तिक जीवनातील चांगले आणि वाईट आणि गुण-दोष पाहण्यास सक्षम आहे. अशी प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी रविवार २५ मे २०२५ रोजी, त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव याला सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्याची घोषणा केली. त्यांनी असेही म्हटले की ‘’मोठ्या मुलाचे उपक्रम, सार्वजनिक वर्तन आणि बेजबाबदार वागणूक हे आपल्या कौटुंबिक मूल्ये आणि परंपरांना शोभत नाही. म्हणून, अश्या परिस्थितीमुळे, तेज प्रताप यांची आतापासून पक्षात आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही’’. असे लालू प्रसाद यादव यांच्या X अकाउंटच्या माध्यमातून सांगितले.

ते असेहि म्हणाले की, ‘’तो त्याच्या वैयक्तिक जीवनातील चांगले आणि वाईट आणि गुण-दोष पाहण्यास सक्षम आहे. त्याच्याशी कोण संबंध ठेवेल हे ज्याने त्याने ठरवावे. मी नेहमीच लोकजीवनमधील लोकलाजचा समर्थक आहे. कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात ही विचारसरणी स्वीकारली आहे आणि मी कायम त्याचे पालन केले आहे. धन्यवाद’’.

लालूं यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव अनेकदा वादग्रस्त गोष्टिंमुळे चर्चेत राहिले आहे. २०१८ मध्ये त्यांनी राजद आमदार चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या राय यांच्याशी केलेले लग्न, जे त्याच वर्षी घटस्फोटाच्या अर्जात संपले. पण शनिवारी, २४ मे रोजी तेज प्रताप यादव यांनी फेसबुकवर अनुष्का यादवसोबत १२ वर्षांचे नाते जाहीर करताना पोस्ट केली.

"मी तेज प्रताप यादव आहे आणि या फोटोमध्ये माझ्यासोबत दिसणारी व्यक्ती अनुष्का यादव आहे! आम्ही गेल्या १२ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि एकमेकांवर प्रेम करतो." त्यानंतर काही वेळातच, पोस्ट हटवण्यात आली आणि तेज प्रताप यांनी एक्सवर दावा केला की त्यांचे अकाउंट हॅक करण्यात आले आहे आणि त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी फोटो एडिट करण्यात आले आहेत, असे तेज प्रताप यादव म्हणाले. शिवाय, तेज प्रताप आणि अनुष्काचे अधिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत, ज्यामध्ये त्यांच्या लग्नाचे दृश्ये समाविष्ट आहेत. तेज प्रताप आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाचा वाद अद्याप सुटलेला नसल्यामुळे, अनुष्कासोबतचे त्यांचे नाते कायदेरित्या प्रश्नही निर्माण होतात.






Powered By Sangraha 9.0