सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळ अबू धाबीतल्या बॅप्स स्वामीनारायण हिंदू मंदिरात! काय घडलं?

24 May 2025 17:08:01

all party delegation visits baps temple

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (all party delegation visits baps temple) 
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकचा बुरखा फाडण्यासाठी परदेशदौऱ्यावर निघालेल्या सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळने संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या भेटीदरम्यान अबू धाबी येथील जगप्रसिद्ध बॅप्स स्वामीनारायण हिंदू मंदिराला भेट दिली. यावेळी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, भाजप खासदार बन्सुरी स्वराज, मनन कुमार मिश्रा आणि एस.एस. अहलुवालिया, बीजेडी खासदार सस्मित पात्रा, खासदार ई.टी. मोहम्मद बशीर आणि जपानमधील भारतीय राजदूत सुजान चिनॉय उपस्थित होते.

हे वाचलंत का? : पाकड्यांकडून वंशविच्छेदचा व्यापक कट!

मंदिराचे सौंदर्य, शांतता आणि आध्यात्मिक वातावरण पाहून शिष्टमंडळ खूप प्रभावित झाले. मंदिराचा जागतिक सौहार्द आणि एकतेचा संदेश सर्वांच्या हृदयाला भिडला. भारतातील युएईचे राजदूत संजय सुधीर आणि मंदिराचे अध्यक्ष अशोक कोटेचा यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. सर्वांनी मंदिर परिसराला भेट दिली आणि त्याचे महत्त्व समजून घेतले.

बीएपीएस हिंदू मंदिर हे शांती, एकता आणि सामायिक मूल्यांचे प्रतीक आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी बीएपीएस संस्थेच्या प्रयत्नांचे शिष्टमंडळाने कौतुक केले. तसेच, भारत आणि यूएईच्या नेतृत्वाचेही कौतुक करण्यात आले, ज्यांच्या सहकार्याने हे मंदिर शक्य झाले. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर भारत आणि युएईमधील मैत्रीचे प्रतीक देखील आहे. मंदिराला भेट देऊन, शिष्टमंडळाने जागतिक स्तरावर भारताचा सांस्कृतिक वारसा पाहिला आणि तो अधिक देशांमध्ये घेऊन जाण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. मंदिराच्या स्थापत्यकलेने आणि कारागिरीने सर्वांना मोहित केले, जे भारतीय कारागिरीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

Powered By Sangraha 9.0