झारखंडमध्ये दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

24 May 2025 18:11:56

Two Naxalites killed in Jharkhand
 
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी झारखंडमधील लातेहारमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. शनिवारी सकाळी, सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांनी झारखंड जनमुक्ती परिषद (जेजेएमपी) या नक्षलवादी संघटनेचा प्रमुख पप्पू लोहारा याला ठार मारले, ज्याच्या डोक्यावर १५ लाख रुपयांचे बक्षीस होते.
 
जेजेएमपीचा प्रमुख पप्पू लोहारा त्याच्या संघटनेतील नक्षलवाद्यांसह इच्छावारच्या जंगलात हिंसक घटना घडविण्याचा कट रचत असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुखांना मिळाली होती. त्यानंतर त्यानंतर पोलिस अधिकारी आणि सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली. शोध मोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांना पाहून नक्षलद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. या चकमकीत पप्पू लोहारासह अन्य एक नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या वेळी ५ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या पप्पू गंजूलाही मारण्यात आले आहे.
 
पोलिसांनी दोन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत आणि परिसरात शोध मोहीम सुरू आहे. जेजेएमपी नक्षलवादी संघटना लातेहार आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये खूप सक्रिय होती. गेल्या अनेक दिवसांपासून या संघटनेविरुद्ध पोलिसांकडून सतत कारवाई केली जात होती. शुक्रवारी रात्री मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे, पोलिसांनी वेढा घालून दोन नक्षलवाद्यांना ठार केले. फरार नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी पोलिस परिसरात शोध मोहीम राबवत आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0