निलेश चव्हाण फरार! वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी संबंध काय?

24 May 2025 13:09:31
 
Nilesh Chavan
 
पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके पाठवण्यात आली आहेत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या ९ महिन्यांच्या बाळाची हेळसांड केल्याच्या आरोपाखाली निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पुण्यातील मुळशी तालुक्यातील राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी वैष्णवी हगवणे हिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. याप्रकरणात आतापर्यंत वैष्णवीचे सासरे, सासू, नवरा, दीर आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  "धार्मिक कार्याच्या नावाखाली निवासी इमारती आणि चाळींमध्ये..."; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
 
निलेश चव्हाण हा वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेचा मित्र आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या नणंदेने निलेशकडे तिचे ९ महिन्यांचे बाळ सोपवले होते. वैष्णवीच्या माहेरची मंडळी ते बाळ ताब्यात घेण्यासाठी गेले असता निलेशने त्यांना धमकी देऊन परत पाठवले. २१ मे पासून निलेश चव्हाण फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
 
निलेश चव्हाणचा कमेरला पिस्तूल बांधून डान्स करत असतानाचा एक जुना व्हिडीओही व्हायरल झाला आहे. निलेशचा भाऊ आणि वडीलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, निलेश चव्हाण पोलिसांसमोर आत्मसमोर करणार असल्याचीही माहिती पुढए आली आहे. .
 
 
 
Powered By Sangraha 9.0