संतापजनक! तिरुपती बालाजी मंदिरात धर्मांधाने पढला नमाज; 'TTD'चेही मौन

24 May 2025 12:22:51

Namaz Case in Tirupati Temple

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Namaz Case in Tirupati Temple)
आंध्र प्रदेशच्या तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिरात एका इस्लाम समर्थक व्यक्तीने नमाज पठण केल्याची घटना समोर आली आहे. ज्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. संबंधित व्यक्तीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत असून यामध्ये तो नमाज अदा करताना स्पष्ट दिसतोय. या मुद्द्यावर टीटीडीने मात्र मौन बाळगल्याचे पाहायला मिळतेय.

हे वाचलंत का? : हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी



सदर व्हिडिओ देवस्थानमच्या पवित्र परिसरात असलेल्या कल्याण मंडपातील असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक मंदिर ट्रस्टच्या नियमांनुसार तिरुपती बालाजी मंदिरात गैरहिंदूंना प्रवेश बंदी आहे. तरीही, जर कुठल्याही गैरहिंदूला भगवान बालाजीचे दर्शन घ्यायचे असेल तर त्याला एक घोषणापत्र सादर करावे लागते. त्यामध्ये तिरुपती बालाजीवर विश्वास का आहे हे स्पष्ट करावे लागते. मंदिराचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी टीटीडीची आहे. मात्र त्यांनी या घटनेवर मौन बाळगले आहे.

Powered By Sangraha 9.0