झोपू प्राधिकरणातील जनता दरबारचे उदघाटन

24 May 2025 20:29:43
झोपू प्राधिकरणातील जनता दरबारचे उदघाटन

मुंबई, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार, दि. २३ मे रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई कार्यालयात भेट दिली. त्यावेळी त्यांनी कार्यालयात जनतेच्या तक्रार निवारणासाठी 'जनता दरबाराचे'तसेच विश्वेश्वरैया अभियंता वास्तु विशारद कॉन्फरन्स कक्षाचे उद्घाटन केले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकल्प बाधित सदनिका धारकांना चाव्या, वारस पत्र, पती पत्रीच्या संयुक्त नावाची नोंद असलेल्या परिशिष्ट दोनच्या प्रमाणित प्रती जनतेला वितरित करण्यात आल्या.

मुख्यमंत्री सुधारणा कार्यक्रम आयोजित क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी '१०० दिवसांसाठी ७ कलमी कृती आराखडा' अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई कार्यालयात संकेतस्थळ सुधारणा, कार्यालयीन स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभसेवा, गुंतवणुकीस चालना आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामध्ये विशेष कामगिरी करत ८२.१६ गुण प्राप्त केले आहेत. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, आमदार दिलीप लांडे, प्राधिकरणातील अधिकारी कर्मचारी व सामान्य जनता उपस्थित होती.


Powered By Sangraha 9.0