मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांची झोपू प्राधिकरणाला भेट

24 May 2025 17:37:37

Chief Information Commissioner Rahul Pandey visits ZOPU Authority
 
मुंबई: (  Chief Information Commissioner Rahul Pandey visits ZOPU Authority ) महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त राहुल भालचंद्र पांडे यांनी दि.२१ मे रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी माहितीचा अधिकार कायदा व त्याचा शासकीय कार्यालयांतील प्रभावी वापर तसेच माहितीचे सक्रिय प्रगटीकरण यासंबंधी प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
 
यावेळी राहुल पांडे यांनी '१०० दिवसांसाठी कलमी कृती आराखडा अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात राबविण्यात आलेल्या विविध सुधारणा व कार्यालयीन कार्यपद्धतींची पाहणी केली. त्यांच्या निरीक्षणानंतर त्यांनी प्राधिकरणाच्या कार्यक्षमतेचे व झोपुप्रा बृहन्मुंबई प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कौतुक केले. तसेच ४.५ करोड दस्त स्कॅनिंग व कागदपत्रांची संगणकीय दस्ताऐवजीकरण केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांचे अभिनंदन केले.
 
या प्रसंगी झोपुप्रा बृहन्मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबईने संकेतस्थळ सुधारणा, कार्यालयीन स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभसेवा, गुंतवणुकीस चालना आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामध्ये विशेष कामगिरी करत ८२.१६ गुण गुण प्राप्त केले आहेत. मुख्य माहिती आयुक्तांनी झोपुप्राच्या या उल्लेखनीय कामगिरीचे अभिनंदन करत, इतर शासकीय व निमशासकीय संस्थांनीही असेच कार्यप्रणाली अंगीकाराव्यात, असे मत व्यक्त केले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0