पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपतर्फे राज्यभर कार्यक्रम

24 May 2025 12:53:15
 
BJP organizes programs occasion of the tercentenary of Punyashloka Ahilyadevi Holkar birth anniversary
 

मुंबई: (BJP organizes programs occasion of the tercentenary of Punyashloka Ahilyadevi Holkar birth anniversary) “राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी भाजपच्यावतीने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
दि. 21 मे रोजीपासून राज्यात हे अभियान सुरू झाले असून दि. 31 मे रोजी त्याची सांगता होणार आहे. अहिल्यादेवींनी 300 वर्षांपूर्वी दिलेले योगदान, जनहितार्थ केलेली कामे या अभियानातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत,” अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि अभियानाचे संयोजक विजय चौधरी यांनी शुक्रवार, दि. 23 मे रोजी दिली.
 
“भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, या अभियानाच्या सहसंयोजक वर्षा भोसले, डॉ. स्मिता काळे-बंडगर आदी उपस्थित होते. वक्तृत्व, निबंध स्पर्धा, प्रदर्शने, नाटिका, युवा व महिला संमेलने, शोभायात्रा यांच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या कार्याची ओळख करून देण्यात येईल,” असे चौधरी यांनी नमूद केले. “दि. 29 मे रोजी चांदवड येथील रंगमहाल या होळकर वाड्यात होळकरांचे वंशज महाराज श्रीमंत शिवाजीराव होळकर, युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर, श्रीमंत अमरजित बारगळ, पालकमंत्री गिरीश महाजन आणि आ. राहुल आहेर यांच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
या अभियानात अहिल्यादेवींशी संबंधित 40 हून अधिक ठिकाणी मंदिरे, घाटांची सफाई तसेच महाआरती, शिवस्तोत्र पठण, वेदपठण यांसारखे कार्यक्रम होणार आहेत. अहिल्यादेवींच्या कार्याची ओळख करून देणारी दहा लाख पत्रके, तसेच 25 हजार पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0