नवी दिल्ली, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सुरक्षा मुद्द्यांवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या १३ व्या आंतरराष्ट्रीय बैठकीत सहभागी होण्यासाठी मॉस्कोला भेट देण्याची शक्यता आहे. ही परिषद २७ ते २९ मे दरम्यान रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये होणार आहे.
रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव सर्गेई शोइगु यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. शिखर परिषदेदरम्यान डोभाल त्यांच्या विविध समकक्षांशी द्विपक्षीय बैठका घेतील, ज्यात शोइगु यांचा समावेश आहे. द्विपक्षीय सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षा मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी डोवाल रशियन अधिकाऱ्यांशी भेटण्याची अपेक्षा आहे.
पाकिस्तानी दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आणि भारत-रशिया संयुक्त उपक्रम असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी आणि एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने बजावलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर ही भेट आणखी महत्त्वाची मानली जाते. रशियाने बनवलेली एस-४०० संरक्षण प्रणाली, भारताच्या आकाशतीर संरक्षण प्रणालीसह, भारतासाठी महत्त्वाची ठरली. या यंत्रणांनी पाकचे हल्ले मोडून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.