कामठी कॅन्टोन्मेंट हद्दीतील खसरा क्रमांक 122 मधील प्लॉट धारकांना दिलासा

23 May 2025 12:19:52

Minister Chandrashekhar Bawankule instructions to submit a complete proposal regarding the entries in the Satbara records
 
मुंबई: कामठी कॅन्टोन्मेंट हद्दीतील खसरा क्रमांक 122 मधील प्लॉट धारकांना दिलासा देण्याचा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
 
मौजे येरखेडा तालुका कामठी जिल्हा नागपूर येथील खसरा क्रमांक 122 मधील सातबारा अभिलेखातील महाराष्ट्र शासनाच्या नावाची नोंद कमी करण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. सदर जमिनीचा ताबा प्लॉट धारकांकडे असून सातबारावर देखील त्यांची नावे आहेत. या अनुषंगाने मागणीचा विचार करून बैठकीत निर्देश दिले.
 
कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड चे मुख्याधिकारी यांनी सद्यस्थिती ची पूर्ण माहिती द्यावी. तहसीलदार यांनी याबाबत अहवाल शासनाकडे पाठवावा. या सर्व 36 प्लॉट धारकांच्या अनुषंगाने परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावे अशा सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख उपस्थित होते. तसेच नागपूरचे जिल्हाधिकारी, तहसीलदार कामठी, कॅन्टोन्मेंट बोर्ड चे मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी झाले होते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0