सातारा : (Dasbodh Abhyas Shibir) पाटण तालुक्यात असलेल्या चाफळ श्रीराम मंदिर परिसरात चार दिवसीय दासबोध अभ्यास शिबीर नुकतेच संपन्न झाले. यावेळी आ. स. भ. योगेश बुवा रामदासी यांच्या हस्ते 'प्रकटले चाफळ क्षेत्री श्रीराम' पुस्तक प्रकाशित करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान डॉ. गोडबोले, भूषण स्वामी, चाफळ देवस्थानचे ट्रस्टी दिलीप गुरव, अभ्यास वर्गाचे अध्यक्ष सुहास क्षिरसागर व बोधे काका उपस्थित होते.
प्रकाशन समारंभात श्री समर्थ स्मारकाच्या पथदर्शक पाट्या आणि स्मारकाच्या देणगीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही श्रीराम मंदिर चाफळचे विश्वस्त दिलिप गुरव आणि कराड अर्बन बॅंकेच्या वतीने देण्यात आली. या कार्यक्रमास समर्थ संस्थान, समर्थ मंडळ आणि चाफळ मंदिर व्यवस्थापन उपस्थित होते. आभ्यास शिबीर आणि पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदात संपन्न झाला.
मंदिरामध्ये अहिंदू लोकांना प्रवेश देणे, त्यांना बांधकाम करण्याचे कंत्राट देणे अशा विविध गोष्टींवर जाहीर निषेध व्यक्त करत उपस्थितांनी श्रीराम मंदिराचे व्यवस्थापक सुतार यांना निवेदन दिले. दुपारच्या वेळेत मंदिर परिसरात सुरक्षा वाढवावी अशीही मागणी सर्व भाविकांकडून करण्यात आली. वरील सर्व गोष्टींना त्वरित निर्बंध करावा आणि पुढील काळात पुन्हा अशा गोष्टी होणार नाहीत याची सक्त काळजी मंदिर व्यवस्थापनाने घ्यावी अशी मागणी शिबिरार्थी आणि सर्व भाविकांकडून होत आहे.