"त्या क्रुरकर्म्यांना मरेस्तोवर..."; हगवणे पिता-पुत्राच्या अटकेनंतर चित्रा वाघ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

23 May 2025 12:43:29
 
Chitra wagh
 
मुंबई : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील प्रमुख आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना अटक करण्यात आली आहे. या अटकेवर आता सर्वच क्षेत्रांतून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
 
शुक्रवार, २३ मे रोजी फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला स्वारगेट परिसरातून पोलिसांनी अटक केली. चित्रा वाघ यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, "अखेर वैष्णवीचे फरार असलेले क्रुरकर्मा हरामखोर मारेकरी सासरा राजेंद्र हगवणे दीर सुशील हगवणे यांना अटक झालेली आहे. देवेंद्र फडणवीस जी या हरामखोरांना मरेस्तोवर फाशी द्या," अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
हे वाचलंत का? - हगवणे पिता-पुत्राच्या अटकेनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया! मकोका लावण्याबाबत काय म्हणाले?  
 
काय आहे नेमकं प्रकरण?
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. लग्नात २१ तोळे सोने, मर्सिडीज गाडी आणि विविध महागड्या वस्तू देऊनही सासरच्या मंडळींकडून वैष्णवीकडे सातत्याने पैशांची मागणी करण्यात येत होती. यातूनच तिचा मानसिक आणि शारिरीक छळही करण्यात आला. याच छळाला कंटाळून अखेर तिने स्वत:ला संपवले. या प्रकरणाने राज्याभरात एकच खळबळ उडाली असून वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिची सासू लता हगवणे, नणंद करीश्मा हगवणे आणि नवरा शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0