"पाकिस्तान असो किंवा आणखी कुठे..."; दहशतवाद विरोधात एस.जयशंकर यांचे मोठे विधान!

22 May 2025 17:18:12

S Jaishankar says India will stay firm on decision

नवी दिल्ली – "दहशतवादी पाकिस्तानमध्ये असोत किंवा आणखी कुठे, आम्ही त्यांना शोधून काढू", असे म्हणत केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. नवी दिल्ली येथे नुकत्यात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले आहे.

ते म्हणाले, भारत आता 'संयमाची' भूमिका न घेता 'कारवाईची' भूमिका स्वीकारत आहे. नुकत्याच पार पडलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या मिशनचा उल्लेख करताना त्यांनी स्पष्ट केलं की, भारताच्या सीमेबाहेर असलेल्या दहशतवादी ठिकाणांवरही आवश्यक असल्यास कारवाई करण्यात येईल.

पाकिस्तानमधील दहशतवादी तळं, त्यांना मिळणारा पाठिंबा आणि सीमापारून होणाऱ्या घुसखोरीचा उल्लेख करत जयशंकर म्हणाले, आता भारत सहन करणार नाही तर सडेतोड उत्तर देईल. दहशतवादाविरुद्धची लढाई ही केवळ आपल्या सुरक्षेसाठी नाही, तर संपूर्ण जगाच्या सुरक्षेसाठी महत्वाची आहे.

या वक्तव्यावर देशभरातून समर्थन व्यक्त होत आहे. लष्करी व राजकीय तज्ञ देखील या धोरणाला 'नवीन भारताचा आक्रमक दृष्टिकोन' असे संबोधत आहेत. भारताची ही भूमिका केवळ राजकीय नव्हे, तर धोरणात्मकदृष्ट्याही महत्त्वाची ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0