पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण

21 May 2025 19:34:38
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण

नवी दिल्ली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आल्याची माहिती विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

दरवर्षी 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची जन्म जयंती साजरी केली जाते. यंदा अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती त्यांच्या जन्म गावी अहिल्यानगर येथील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे भव्य स्वरूपात होणार आहे. त्याचे निमंत्रण राष्ट्रपती यांना देण्यासाठी आज राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतल्याचे त्यांनी नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

याच महिन्यात 6 मे 2025 रोजी अहिल्यानगर येथे मंत्रीमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. ते पुढे म्हणाले, मंत्री मंडळाच्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. चौंडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या या सूतगिरणीसाठी ९१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. चौंडी ते निमगाव डाकू २.७०० किमी लांबीचा रस्ता होणार आहे. राज्य शासनाने ३ कोटी ९४ लक्ष एवढ्या खर्चास मान्यता दिलेली आहे.


Powered By Sangraha 9.0