जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार केवळ २०० रुपयात! महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय

21 May 2025 15:33:38
 
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : राज्याच्या महसूल विभागाने हिस्सेवाटप मोजणी शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केली असून आता केवळ २०० रुपये शुल्कात जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "एकत्र शेतकरी कुटुंबातील सदस्यांना आपापल्या जमिनीचा हिस्सा स्पष्ट होण्यासाठी जमिनीची हिस्सेवाटप मोजणी करणे आवश्यक असते. आतापर्यंत या प्रक्रियेसाठी १ हजार रुपयांपासून ४ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जायचे. आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा खर्च देखील त्यांच्यावरील आर्थिक बोजा वाढविणारा असतो. यासाठीच राज्याच्या महसूल विभागाने हिस्सेवाटप मोजणी शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केली असून आता केवळ २०० रुपये शुल्कात ही प्रक्रिया केली जाईल."
 
हे वाचलंत का? -  विनाकारण ओला-उबेरची फेरी रद्द करताय? आता भरावा लागणार दंड! काय आहे शासन निर्णय?
 
"हा निर्णय राज्यातील अनेक शेतकऱ्यांना थेट लाभ आणि दिलासा देणारा आहे. हिस्सेवाटप मोजणी प्रक्रियेतील शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात करणारा हा निर्णय, राज्यातील शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरेल ही मला खात्री आहे," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0