नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चित्रपटसृष्टीत क्रांती घडवणारे प्रशिक्षण ‘अपटेक’ची व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्पेशालिस्ट!

20 May 2025 13:34:08

uptakes virtual production specialist program,


मुंबई : पारंपरिक चित्रपट निर्मिती, रिअल टाइम सीजीआय आणि गेमिंग टेक्नॉलॉजी यांचा मेळ घालत सध्या चित्रपट व मनोरंजन सृष्टीत एक नवे क्रांतिकारी पर्व सुरू झाले आहे. व्हर्च्युअल प्रॉडक्शन. या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आज कलाकार, दिग्दर्शक आणि वीएफएक्स तज्ज्ञ अधिक वास्तवदर्शी, भव्य आणि दृष्यदृष्ट्या प्रभावी कथा साकारत आहेत. या क्षेत्रातील वाढती मागणी ओळखून आघाडीची तंत्रशिक्षण संस्था अपटेकने ‘व्हर्च्युअल प्रॉडक्शन अकॅडमी’ सुरू केली असून, त्याअंतर्गत व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्पेशालिस्ट हा विशेष अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी खुला केला आहे.


हा अभ्यासक्रम केवळ सैद्धांतिक शिक्षणापुरता मर्यादित न राहता, हँड्स-ऑन ट्रेनिंगवर भर देणारा आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष सेटवर वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी परिचित होतात. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल सेट डिझाइन, इन-कॅमेरा वीएफएक्स, रिअल टाइम रेंडरिंग, ग्रीन स्क्रीन टेक्निक्स, एलइडी वॉल टेक्नॉलॉजी, आणि मोशन कॅप्चर या महत्त्वाच्या बाबींमध्ये प्रशिक्षण दिले जाते. या सगळ्या गोष्टी आजच्या डिजिटल प्रोडक्शनच्या केंद्रस्थानी आहेत. व्हर्च्युअल प्रॉडक्शन ही केवळ एक तांत्रिक क्रांती नसून ती सर्जनशीलतेचंही नवदालन आहे. रिअल टाइम तंत्रज्ञानामुळे कलाकार, दिग्दर्शक आणि वीएफएक्स कलाकार यांना शूटिंग दरम्यानच अंतिम दृश्य कसे दिसेल याची झलक मिळते. यामुळे पोस्ट-प्रॉडक्शनवरील अवलंबित्व कमी होते आणि वेळ व खर्च वाचतो.


'व्हर्च्युअल प्रॉडक्शन’ हे माध्यम फिल्ममेकिंग आणि गेमिंग यांच्यातील सीमारेषा पुसून टाकते आहे. आज मार्वल्स, डिजनी, आणि नेटफिल्क्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्टुडिओजनी या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. भारतातही हळूहळू त्याचा शिरकाव होत असून, या क्षेत्रात प्रशिक्षित तज्ज्ञांची मोठी मागणी निर्माण झाली आहे.अपटेकचा हा अभ्यासक्रम चित्रपट निर्माते, डिजिटल कंटेंट क्रिएटर्स, वीएफएक्स कलाकार, गेम डेव्हलपर्स आणि मल्टिमीडिया डिझाइनर यांच्यासाठी सुवर्णसंधी ठरतो. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करत अनुभव मिळतो. यामुळे फक्त ज्ञानच नव्हे तर आत्मविश्वास आणि बाजारातील स्पर्धेत टिकून राहण्याची तयारीही होते. या अभ्यासक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना तकनीकी आणि सर्जनशील दोन्ही अंगांनी सक्षम करणं. त्यामुळे त्यांनी फक्त डिजिटल सीन तयार करावेत असं नाही, तर ते त्या सीनच्या संकल्पना, दिग्दर्शन व कार्यान्वयन यामध्येही सक्रिय भूमिका बजावू शकतात.


''व्हर्च्युअल प्रॉडक्शन ही आजच्या काळातील सर्वात क्रांतिकारी फिल्ममेकिंग प्रक्रिया आहे. यातून निर्माण होणाऱ्या दृश्यविश्वात प्रेक्षक हरवून जातो आणि कलाकाराला त्याची सर्जनशील झेप घेता येते,'' असे मत अनेक तज्ज्ञांनी नोंदवले आहे. सारांशतः, व्हर्च्युअल प्रॉडक्शन क्षेत्र हे भविष्यातील चित्रपटसृष्टीचा पाया ठरणार आहे. अशावेळी अपटेकसारख्या संस्थेने सुरु केलेला व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्पेशालिस्ट कोर्स म्हणजे डिजिटल मनोरंजन उद्योगात प्रवेश करण्यासाठी एक भक्कम पाऊल आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांनी ही संधी नक्कीच सोडू नये.



Powered By Sangraha 9.0