उबाठा गटाची काँग्रेसी मानसिकता पुन्हा उघड! सुषमा अंधारेंकडून भारतीय सैन्याचा अपमान; ऑपरेशन सिंदूरचे मागितले पुरावे

20 May 2025 13:32:21
 
Sushma Andhare
 
मुंबई : उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून भारतीय सैन्याचा अवमान करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे पुरावे मागितले असून यामुळे उबाठा गटाची काँग्रेसी मानसिकता पुन्हा उघड झाल्याची टीका राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.
 
न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात सुषमा अंधारे बोलत होत्या. या कार्यक्रमात विविध पक्षांचे प्रवक्ते सहभागी झाले होते. यामध्ये शरद पवार गटाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आणि शिवसेनेचे अरूण सावंत इत्यादी नेते सहभागी होते.
 
हे वाचलंत का? -  मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "मी अनेक खाती..."
 
यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी सुरुवातीला सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या विजय शाह यांच्याबद्दल भाजपने काय भूमिका घेतली? असा सवाल केला. त्यानंतर कराची आणि इस्लामाबाद ताब्यात घेतल्याचा मीडियाने केलेला प्रचार किती खरा आणि किती खोटा आहे? असा सवाल त्यांनी केला. एवढेच नाही तर युद्धादरम्यान, फिलाडेल्फियाचे चित्र पाकिस्तानातील असल्याचे दाखवले आणि युक्रेनमधील स्टेडियम कराचीमधील असल्याचे दाखवल्याचे विधान त्यांनी केले.
 
वास्तविक भारतीय लष्कराने वारंवार ऑपरेशन सिंदूरची भूमिका मांडली. लष्कराकडून ऑपरेशन सिंदूरबाबतचे अनेक पुरावेही देण्यात आलेत. परंतू, त्यानंतरही विरोधी पक्षांना त्यांच्यावर विश्वास नसल्याचे दिसते आहे. यातूनच आता सुषमा अंधारेंनी भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीवर संशय व्यक्त करून त्यांचा अपमान केल्याचे बोलले जात आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0